महाविद्यालयीन विद्यार्थिनीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार
Breaking News | Amravati Crime: अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धककादायक घटना आली समोर.
अमरावती : अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीला फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या घटनेची तक्रार पीडितीने शुक्रवारी (दि. 20) राजापेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी चेतन बाळू बंगाले (वय 23, रा. फुबगाव, चांदूरबाजार) याच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तक्रारीनुसार, , ती इलेक्ट्रानिक्सच्या प्रथम वर्षाला शिकत आहे. तिची ओळख महाविद्यालयात बसने ये-जा करत असताना चेतन बंगालेसोबत झाली होती. त्यानंतर चेतन हा तिला अधुनमधून गाडगेनगरच्या पंचवटी चौकात भेटत होता. एकेदिवशी चेतन हा विद्यार्थिनीला भेटायला गेला. मात्र, ती आली नाही. त्यामुळे त्याने विद्यार्थिनीला त्रास देणे सुरू केले. तसेच तू भेटण्यास न आली, तर मी तुझ्या वडिलांना मारहाण करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता घाबरली होती. त्यामुळे आरोपीच्या सांगण्यावरून ती तपोवनेश्वर येथे भेटण्यास गेली. त्याने विद्यार्थिनीला साडी घालण्यास सांगून मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.
नंतर चेतन बंगाले याने या मुलीवर अत्याचार केला. इतकेच नाहीतर अत्याचाराचे चित्रीकरण करून फोटो इन्स्ट्राग्राम, फेसबुकवर व्हायरल करण्याची धमकी दिली.
डिसेंबर 2023 मध्ये चेतनने विद्यार्थिनीला अमरावती रेल्वे पुलाजवळ असणाऱ्या एका लॉजमध्ये नेले आणि तिच्या इच्छेविरुध्द तिच्याशी शारिरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्याने मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. त्यानंतरही आरोपीने विद्यार्थिनीला रिलेशन ठेवण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे अखेर चेतनच्या त्रासाला कंटाळून पीडित विद्यार्थिनीने राजापेठ पोलिसात तक्रार दिली.
Web Title: College student sexually assaulted by threatening to go viral
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News