Home अहिल्यानगर अहिल्यानगर: महाविद्यालयातील तरुणीचे लग्नासाठी अपहरण

अहिल्यानगर: महाविद्यालयातील तरुणीचे लग्नासाठी अपहरण

Breakig News | Ahilyanagar Crime: महाविद्यालयातील तरुणीचे लग्नासाठी अपहरण करण्यात आले.

College girl kidnapped

श्रीरामपूर : येथील महाविद्यालयातील तरुणीचे लग्नासाठी अपहरण करण्यात आले. पीडितेच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्यात तरुणासह त्यास मदत करणारी त्याची बहीण व आतेभाऊ या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. वैजापूर तालुक्यातील कोल्ही येथील तरुणीच्या वडिलांनी फिर्याद नोंदविली आहे.

मुलगी श्रीरामपूरला शिक्षणासाठी दोन वर्षांपासून राहते. कमालपूर (ता. श्रीरामपूर) येथील मेहुण्याचा फोन आला. मुलगी महाविद्यालयातून बाहेरगावी गेली, असे त्यांनी सांगितले. तिचा सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आली नाही. तिच्या बेपत्ताप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात खबर नोंदविली आहे.

काही दिवसांपूर्वी निखिल नावाच्या तरुणाचा फोन आला होता. त्याने दमबाजी केली होती, अशी माहिती अन्य एका मुलीने अपहृत मुलीच्या वडिलांना दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदविल्यानंतर निखिल या नावाच्या तरुणाने मुलीस बळजबरीने लग्न करण्यासाठी पळवून नेल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितले. निखिल याने मुलीला पळवून नेण्यासाठी त्याची बहीण व आतेभाऊची मदत घेतली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

Web Title: College girl kidnapped for marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here