Home अहमदनगर अहिल्यानगर: महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अहिल्यानगर: महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News | Ahilyanagar Suicide: राहत्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेत महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या.

College girl commits suicide by hanging herself

बेलवंडी : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे राहत्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेत महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केली. सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सायली सुखदेव महाडिक (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

या घटनेनंतर मयत मुलीचे वडील सुखदेव नाथा महाडिक (रा. बेलवंडी, ता. श्रीगोंदा) यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाडिक कुटुंब बेलवंडी येथे राहते. सोमवारी (ता. ३०) रात्री मुलीचे वडील हे शाळेच्या सहलीवरून आलेल्या पत्नीला आणण्यासाठी घराबाहेर गेले होते. रात्री अकराच्या सुमारास घरी आल्यानंतर मुलीने घराचा दरवाजा उघडला नाही. त्यावेळी खिडकीतून पाहिले असता तिने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, सायली हिला श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

Web Title: College girl commits suicide by hanging herself

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here