कॉलेज तरुणीची आत्महत्या, प्रियकराला अटक
Breaking News | Suicide Case: शासकीय वसतिगृहात कॉलेज तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर याला चेंबूर पोलिसांनी अटक केल्याची घटना.
मुंबई : चेंबूरच्या शासकीय वसतिगृहात कॉलेज तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर धनंजय ललित तळवडेकर याला चेंबूर पोलिसांनी अटक केली. दीक्षा कल्पेश कांबळे असे आत्महत्या केलेल्या तरुणीने नाव असून तिने 17 ऑक्टोबरला आत्महत्या केली. याप्रकरणी एक महिन्यानंतर गुन्हा दाखल होताच दीक्षाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी धनंजयवर कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दीक्षा ही मूळची सिंधुदुर्गची रहिवाशी आहे. मुंबईत ती शिकण्यासाठी आली होती. वरळीच्या एका नामांकित कॉलेजमध्ये ती शिकत होती. आणि येण्याजाण्याला सोयीचे पडाले म्हणून चेंबूरच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाच्या माता रमाबाई आंबेडकर या मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहत होती. 17 ऑक्टोबरला ती कॉलेजमधून वसतिगृहात आली आणि तिने तिच्या रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत तपास सुरू केला.
दीक्षाच्या वडिलांना दुसर्या मुलीकडून दीक्षा आणि धनंजय यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समजले होते. मात्र, धनंजय सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. क्षुल्लक कारणावरून तिला शिवीगाळ करून धमकी देत होता. काही महिन्यांपासून तिचा धनंजयकडून मानसिक आणि शारिरीक शोषण सुरू झाले होते. या छळाला ती कंटाळून गेली होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
दीक्षाचे वडिल कल्पेश बाळकृष्ण कांबळे यांना हा प्रकार समजताच त्यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात धनंजयविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध दिक्षाचा मानसिक आणि शारीरिक शोषण करून तिला आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
Web Title: College girl commits suicide, boyfriend arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study