नायजेरियन जोडप्याकडून कोटयावधी रुपयांचे कोकेन जप्त
Pune Cocaine worth crores seized: कोकेन एम डी असे अमली पदार्थ, तब्बल एक कोटी एकतीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा.
पुणे: चर्तुःश्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका नायजेरियन जोडप्याकडून कोकेन, एम डी अशा प्रकारच्या अंमली पदार्थ विक्री प्रकरणी ताब्यात (Arrest) घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
याप्रकरणी उगुचुकु इम्पॅन्युअल (वय ४३ वर्षे, रा. नालंदा गार्डन रेसीडन्सी, बाणेर पुणे मूळ देश नायजेरियन) व त्याची पत्नी ऐनीबेली ओमामा व्हिवान (वय ३० वर्षे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या नायजेरियन जोडप्यांची नावे आहेत. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर यांनी फिर्याद दिल्याने या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बाणेर येथील नालंदा गार्डन या सोसायटीत राहणारे एक नायजेरियन जोडपे घरातुन कोकेन, एम डी असे अंमली पदार्थाची मोठया प्रमाणावर विक्री करीत असल्याची माहिती. अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेकडे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार मारुती पारधी यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, शैलजा जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी छापा कारवाई केली. त्यांच्याकडून ६४४ ग्रॅम (एम डी) मॅफेड्रॉन कि रु ९६,६०,०००/- व २०१ ग्रॅम १२० मिलीग्रॅम कोकेन कि रु ३०,१६,८००/- व रोख रुपये ०२,१६,०००/- मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, प्लास्टिक पिशव्या व डब्या असा ०२, १६,०००/ चा असा एकुण १ कोटी ३१ लाख ८ हजार ८०० रुपयांचा अंमली पदार्थ व ऐवज हस्तगत करून जप्त करण्यात आला आहे.
Web Title: Cocaine worth crores seized from Nigerian couple