सहकारी संस्थेची कर्जाची नोटीस आली अन शेतकऱ्याची आत्महत्या
राहुरी | Suicide: राहुरी तालुक्यातील केसापूर येथील शेतकर्याच्या हातात सहकारी संस्थेची कर्जाची नोटीस आली. अन् त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.या घटनेने केसापूर परिसरात शेतकर्यांनी हळहळ व्यक्त केली.
केसापूर येथील शेतकरी महादू सहादू कोतवाल (वय 82) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांना दोन दिवसापूर्वी केसापूर सोसायटीचे थकीत कर्ज भरण्यासंदर्भात पोस्टाने नोटीस मिळाली. आता हे कर्ज कसे फेडणार कसेदोन दिवस ते चिंतेत होते. हतबल झाल्याने मंगळवारी रात्री उशिरा ते घराबाहेर पडले. बाहेर पडण्यापूर्वी सोसायटीच्या कर्जाच्या नोटिशीच्या पाठीमागील बाजूस मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला घरातील कोणालाही जबाबदार धरु नये. मला सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे? हा प्रश्न असल्याने कर्जापायी मी जीवन संपवित असल्याची चिठ्ठी लिहून त्यांनी रात्री आत्महत्या केली. बुधवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघड झाले.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS
Web Title: Co-operative society’s loan notice came and the farmer committed suicide