अकोलेतील घटना: शेतीच्या वादावरून तुंबळ हाणामारी, सात जणांना अटक
Akole Crime: शेतीच्या वादातून हाणामारी, परस्पर विरोधी गुन्हे दाखल होऊन दोन्ही बाजूच्या ७ जणांना अटक (Arrested).
अकोले: शेतीच्या वादातून तुंबळ हाणामारीचे घटना तालुक्यातील कुंभेफळ येथे घडली आहे. याप्रकरणी अकोले पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल होऊन दोन्ही बाजूच्या ७ जणांना अटक केली.
अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथील दोघा भावांच्या कुटुंबातील शेतीचे वाद आहेत. याबाबत पूजा मनोहर पांडे यांनी सुरुवातीला फिर्याद दाखल केली. यामध्ये ४ अॅगस्ट रोजी फिर्यादीचे पती मनोहर भाऊसाहेब पांडे व सासू चंद्रभागा भाऊसाहेब पांडे हे कोर्ट कामासाठी अकोल्यात गेले असता फिर्यादी एकटी घरी असताना घराजवळ असलेल्या शेतातून शुभांगी रवींद्र पांडे, सिंधुबाई कारभारी पांडे यांनी आमच्या शेतात येऊन गिन्नी गवत, ज्वारी व घेवडा उपटण्यास सुरुवात केली. फिर्यादिने आमचे पिके उपटू नका असे म्हटल्याचा त्याचा राग आल्याने शुभांगी पांडे, सिंधुबाई पांडे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच गळ्यातील पोत घेऊन पळून गेला असल्याचे म्हटले. याप्रकरणी आरोपी शुभांगी रवींद्र पांडे, सिंधुबाई कारभारी पांडे, रवींद्र कारभारी पांडे, कारभारी रामू पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करून चौघाना अटक केली.
याबाबत दुसरी फिर्यादी शुभांगी रवींद्र पांडे हिने दाखल केली असून फिर्यादीनुसार, ४ ऑगस्ट रोजी पती व सासरे कोर्टाचे कामासाठी अकोलेत गेले असता फिर्यादी व तिची सासू सिंधूबाई कारभारी पांडे घरी असताना दुपारी पूजा मनोहर पांडे हिने शेतात येऊन शेतातील मका, बिन्नी गवत, सोयाबीन उपटत होती. तिला याचा जाब विचारला असता मारहाण सुरुवात केली. फिर्यादीची सासू सिंधुबाई भांडण सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिलाही शिवीगाळ करत मारहाण केली. मनोहर पांडे व चंद्रभागा पांडे यांनी फिर्यादीच्या गळ्यातील पोत तोडून घेऊन पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटले. यावरून आरोपी पूजा मनोहर पांडे, मनोहर पांडे, चंद्रभागा पांडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करून पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
Web Title: Clash over agricultural dispute, seven people Arrested
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App