संगमनेर: यात्रेत दोन गटांत हाणामारी, सात जणांवर गुन्हा दाखल
Breaking News | Sangamner Crime: समनापूर येथे सुरू असलेल्या यात्रे दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना.
संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे सुरू असलेल्या यात्रे दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास समनापूर येथील मारुती मंदिरासमोरील मोकळ्या पटांगणात घडली. या हाणामारीत एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शहर पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, पंकज गोरक्षनाथ नेहे हा समनापूर येथे कादर शहाबली संदल पाहण्यासाठी गेला असता, तेथे दोन गटात भांडण झाले. या भांडणादरम्यान एका जमावाने दगडफेक केल्याने नेहे याच्या डाव्या पायाच्या नळीला दगड लागला. त्यात तो जखमी झाला. याप्रकरणी पंकज नेहे याने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी सनी गोविंद कडलग, महेश मच्छिद्र रोकडे, रोहित रोकडे, नटराज जाधव, चैतन्य संजय बोराडे, रुद्र राजू रोकडे, शिया राजू रोकडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Clash between two groups during yatra, case registered against seven people