सिनेस्टाईल थरार! युवतीचा पाठलाग करीत गाडीवर गोळीबार
Amravati Crime: अमरावतीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. चारचाकी वाहनावर मागून वाहनाने आलेल्या अज्ञातांनी गोळीबार (Firing) केल्याची खळबळजनक घटना.
अमरावती : दर्यापूर-अमरावती मार्गावर एका मंगल कार्यालयानजिक चारचाकी वाहनावर मागून वाहनाने आलेल्या अज्ञातांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री समोर आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. गोळीबारात अंजनगाव येथील विवाहितेला गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली असून विवाहितेच्या काकाही किरकोळ करकोळ जखमी झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंजनगाव येथील रहिवाशी रामकृष्ण सोळंके हे अमरावती येथून चारचाकी वाहन क्र. एमएच २७ डीए ८७२१ ने पत्नी, भाऊ व विवाहित मुलीसह दर्यापूरमार्गे अंजनगाव सुर्जी येथे जात होते. रात्री ८ वाजेदरम्यान मागून आलेल्या चारचाकी वाहनातून अज्ञात युवकाने चालू वाहनावर गोळीबार केला. बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्यामुळे गाडीचे काच भेदून वाहनात मागील शिटवर बसलेल्या विवाहितेच्या कानाला गोळी छेदून गेल्याने ती गंभीर जखमी झाली.
सदर विवाहिता अमरावती येथील गाडगेनगर पोलीस स्टेशनमधून एका प्रकरणात चौकशीकरीता आली असता वडिलांसोबत परत जात होती. सदर घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली असून याबाबत माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी रात्रीचं दर्यापुरात दाखल होते. सिनेस्टाईल झालेल्या या थरारामुळे रात्री वाहतूक करणाऱ्या नागरिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Cinestyle thrills Firing at the car while chasing the girl
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App