Home अहमदनगर सिनेमास्टाईल चोरी: प्लंबर म्हणून आले अन सोने, रोकड लंपास

सिनेमास्टाईल चोरी: प्लंबर म्हणून आले अन सोने, रोकड लंपास

Cinemastyle theft make Plumber Worker and 

श्रीरामपूर |Theft| Shrirampur:  श्रीरामपूर तालूक्यातील गळनिंब येथे सिनेमास्टाईलने चोरी झाल्याची घटना घडली आहे. भरदिवसा दुपारी 3 ते 4 वाजेच्या सुमारास कोल्हार बेलापूर रोडवरील गावाजवळ असणार्‍या बंगल्यात प्लंबर म्हणून आले आणि १३ ते १४ तोळे सोने, २० भार चांदी, ३० हजार रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची माहिती मिळत आहे.  याप्रकरणी बाभळेश्वर औट पोलीस चौकीत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

गळनिंब येथील श्रीकांत संजय भोसले यांच्या बंगल्यासमोर 3 ते 4 वाजेच्या दरम्यान गेटसमोर एक कार उभी करून गेटच्या आत एकाने प्रवेश केला. श्रीकांत यांचे वडिल पोर्चमध्ये बसले असताना त्यांना विचारले की सरांनी आम्हाला प्लबिंगचे काम पाहण्यास सांगितले आहे, तुमची पाण्याची टाकी कुठे आहे, असे म्हणून आमचे गावात काम चालू आहे आम्ही जाधव आहे, असे सांगितले. वडिलांचे वय जास्त असल्याने व दिसण्यास कमी असल्याने जिन्यावरून गच्चीवर पाण्याची टाक्या दाखवत वडिलांना नादी लावल्यानंतर उर्वरीत दोन इसम कारमधून उतरत घराच्या बेडरूम मध्ये प्रवेश करत कपाटे उचकून सोनं,चांदीसह रोख रक्कम लांबविली. ही बाब संजय भोसले यांच्या लक्षात आल्यानंतर शेजारी पाजारी सांगितले तोपर्यंत चोरटे बेलापूरच्या दिशेने पसार झाले होते.

दरम्यान श्रीकांत भोसले हे श्रीरामपूर येथील हिरो शोरूम मध्ये व पत्नी प्रवरा मेडीकर ट्रस्ट लोणी येथे  नोकरीस आहे. त्यामुळे दिवसभर घरी वृध्द वडिल व दोन लहान मुलेच असल्याची संधी शोधत पाळत ठेवून या चोरट्यांनी ऐवज लंपास केला आहे.

या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी लोणी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांनी भेट पोलिस फौजफाट्यासह भेट दिली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बाभळेश्वर पोलीस चौकीत कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नव्हती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title: Cinemastyle theft make Plumber Worker and 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here