Home संगमनेर संगमनेर तालुक्यात चिमुकलीवर अत्याचार, आरोपी गजाआड

संगमनेर तालुक्यात चिमुकलीवर अत्याचार, आरोपी गजाआड

Breaking News | Sangamner: तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला संगमनेर तालुका पोलिसांनी अटक.

Child raped in Sangamner taluka, accused arrested

संगमनेर : तालुक्यातील एका तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला संगमनेर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. एका तीनवर्षीय चिमुकलीवर साहेबराव रंगनाथ गायकवाड (वय ३८, रा. पिंपरणे, ता. संगमनेर) याने अत्याचार केला.

याप्रकरणी गुन्हा दाखल असून आरोपी फरार होता. पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार तपास पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपीच्या मुसक्या आवळत गजाआड केले. त्याने गुन्हा मान्य केल्याने अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे. ही कारवाई सहायक फौजदार बन्सी टोपले, पोलिस हेडकॉस्टेबल बडदे, अमित महाजन, आशिष आरवडे, सचिन उगले यांनी केली.

Breaking News: Child raped in Sangamner taluka, accused arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here