एसटी बसच्या धडकेत चिमुरडा ठार; बसचालकावर गुन्हा
Satara Accident: एका हॉटेलसमोर भरधाव एस.टी.ने चार वर्षांच्या चिमुरड्याला पाठीमागून धडक दिली. यात हा चिमुरडा ठार.
सातारा: सातारा – पुसेगाव मार्गावर कोरेगाव तालुक्यातील गोळेवाडी गावच्या हद्दीतील एका हॉटेलसमोर भरधाव एस.टी.ने चार वर्षांच्या चिमुरड्याला पाठीमागून धडक दिली. यात हा चिमुरडा ठार झाला. श्रवण प्रसाद गोळे (वय ४, रा. सद्गुरूनगर, कोरेगाव) असे त्याचे नाव आहे. अपघाताची नोंद कोरेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
रविवारी रात्री पुसेगाव-सातारा ही बस (क्रमांक एम. एच. २० बी. एल. ४२७४) साताऱ्याकडे निघाली होती. श्रवण हा महामार्गावरील गोळेवाडी गावच्या हद्दीतील रस्त्यावर खेळत होता. याचवेळी एस. टीची श्रवणला जोरदार धडक बसली. यामध्ये श्रवण हा काही फूट अंतरावर उडून पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, श्रवणचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. चालक संजय बांगर याच्याविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Child killed in collision with ST bus Accident
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study