बालगृहातील मुलाची गळफास घेऊन आत्महत्या – Suicide
बालगृहातील एका १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
अकोला: मलकापूर रोडवर असलेल्या बालगृहातील एका १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे. या मुलाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली असून, अहवाल आल्यानंतर या घटनेचे नेमके कारण समोर येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील बालगृहात असलेला एक १५ वर्षीय मुलगा काही दिवसांपूर्वीच मलकापूर रोडवर असलेल्या बालगृहात आला होता. या ठिकाणी आल्यापासूनही तो शांत राहत असल्याने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न संबंधितांकडून करण्यात येत होता.
मात्र सतत मग्न राहत असलेल्या या मुलाने गुरुवारी दळण काढण्यासाठी चक्कीत जात असल्याचे सांगत या चक्कीचे दार आतून लावले व गळफास घेतला. आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणाची खदान पोलिसांनी पंचनामा केला असून, अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Child commits suicide by hanging himself in a children’s home
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App