Home नाशिक छगन भुजबळ यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र,...

छगन भुजबळ यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, नेमकं पत्रात काय?

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक पत्र.

Chhagan Bhujbal's letter to Prime Minister Narendra Modi 

Chhagan Bhujbal : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार छगन भुजबळ  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलं आहे. मंत्रिमंडळातून वगळलं गेल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. नाशिक या ठिकाणी त्यांनी समता परिषदेचा मेळावा घेतला आणि आपली भूमिका मांडली. दरम्यान छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे.

 “मी आमदार होणं किंवा मंत्री होणं हे माझं काम नाही. मला मंत्रिपदाची हाव असती तर मी १६ नोव्हेंबरला राजीनामा देऊन १७ नोव्हेंबरला आलो नसतो. मी राजीनामा दिला होता पण उल्लेख केला नाही कारण मला तसे फोन सारखे येत होते. मी राजीनामा दिला होता हे मी अडीच महिन्यांनी सांगितलं. माझ्याविरोधात अर्वाच्य बोललं गेलं तेव्हा मी सांगितलं. प्रश्न फक्त मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा आहे. एखाद्या समाजाला बरोबर घेऊन लढणारी माणसं आपल्याकडे आहेत. कुणीही दुःखात राहण्याचं कारण नाही. कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मै बढता गया रास्ता देख कर, खुदही खुद नजदिक आती गयी मंजिल मेरा बुलंद हौसला देखकर”, असं छगन भुजबळ  यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना म्हटलं होतं. त्यानंतर आता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

लाल कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी आपण देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, केंद्रीय वाणिज्यमंत्री मा. पीयूषजी गोयल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. तर महाराष्ट्रातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ करण्यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

शेतकऱ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी, राज्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळणे गरजेचे असून राज्यात उत्पादित लाल कांद्याची परदेशात जास्तीत जास्त निर्यात होणे आवश्यक आहे. त्यासाठी २० टक्के निर्यात शुल्क हटविणे गरजेचे आहे. तसेच श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले आहे.त्यामुळे नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने माफ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आपण केली आहे. आपल्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळून लवकरच आपल्या बळीराजाला दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे, असंही छगन भुजबळ यांनी या पत्रात म्हटलं आहे. (Onion Market Price down)

Web Title: Chhagan Bhujbal’s letter to Prime Minister Narendra Modi 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here