छगन भुजबळ आज घेणार मंत्रीपदाची शपथ, कोणतं खातं मिळणार
Breaking News | Chhagan Bhujbal: राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते छगन भुजबळ आज मंगळवारी 20 मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेणार.
नाशिक: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुभवी नेते छगन भुजबळ मंगळवारी 20 मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबईतील राजभवनात सकाळी 10 वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार असल्याची माहिती आहे. छगन भुजबळ गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. याबाबतची खंत त्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. अनेकदा शेरोशायरी करून टोमणेही मारले होते. इतकंच काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. मात्र त्यांना काही मंत्रिमंडळात जागा मिळाली नव्हती. मात्र आता त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याने भुजबळ समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला 50 जण उपस्थित राहणार आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती असणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा या खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता.
धनंजय मुंडे यांना बीडमधील सरपंच धनंजय देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हा मुंडेकडे अन्न व नागरी पुरवठा हे खातं होतं. मात्र मुंडेच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदावरुन वाद होऊ नये म्हणून पक्षाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते खातं स्वत:कडे ठेवलं होतं. मात्र आता पु्न्हा एकदा भुजबळांना अन्न व नागरी पुरवठा या खात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
छगन भुजबळ यांची ओबीसी नेते अशी ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या या छबीचा महायुती सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो. ओबीसी मतांंसाठी असा निर्णय घेतला असावा अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Breaking News: Chhagan Bhujbal will take oath as minister today, which account