छावा तील मुघलांचा अत्याचार पाहून पडदा फाडला
Chhaava movie : चित्रपटात दाखवलेल्या मुघलांचा अत्याचार सहन न झाल्याने एका प्रेक्षकाने मल्टिप्लेक्सची स्क्रीन फाडल्याची घटना.
Chhava Movie: विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ चित्रपटाला देशभरातील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात दाखवलेल्या मुघलांचा अत्याचार सहन न झाल्याने एका प्रेक्षकाने मल्टिप्लेक्सची स्क्रीन फाडल्याची घटना गुजरातमधील भरुच येथे घडली आहे.
या चित्रपटात मराठा आणि मुघल यांच्यातील संघर्ष दाखवला आहे. स्क्रीन फाडणाऱया प्रेक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. जयेश वसावा असे या आरोपीचे नाव आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत विक्की कौशल, तर महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आणि औरंगजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारीला देशभरात प्रदर्शित झाला आहे.
रश्मिकाच्या पायाला दुखापत झाली असताना ती विकी कौशल सोबत शिर्डी साई मंदिरात दर्शनाला आली. विकीचा हात धरत रश्मिका साई मंदिरात पोहोचली. पायाला दुखापत असल्याने विकी कौशल रश्मिकाला मदत करताना दिसला.साईंच्या मध्यान्ह आरतीनंतर दोघे ही साई मंदिरात दाखल झाले होते.
आयुष्यात कोणतेही शुभकार्य करण्याआधी देवाचा आशीर्वाद घेणे खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच आम्ही आज साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आहोत. सर्वांची प्रगती होऊ दे आणि सर्वांना आनंदी ठेव, अशी प्रार्थना मी साईंच्या चरणी केली, असे विकी कौशल माध्यमांशी बोलताना म्हणाला. तर रश्मिकानेही पहिल्यांदाच शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त केली. यावेळी एका पत्रकाराने तिला मराठीत प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर मराठीत देण्यासाठी विकीने तिची मदत केली. शिर्डीत येऊन कसे वाटले, असा प्रश्न रश्मिकाला विचारण्यात आला. त्यावर विकीचे ऐकून साईबाबांचे दर्शन घेऊन खूप छान वाटले, अशी प्रतिक्रिया रश्मिकाने दिली.
Web Title: Chhaava movie Seeing the atrocities of the Mughals in the camp, the curtain was torn