Home क्राईम संगमनेर: महिलेची फसवणूक: दागिने घेऊन केला पोबारा, विश्वास संपादन करून घातला गंडा

संगमनेर: महिलेची फसवणूक: दागिने घेऊन केला पोबारा, विश्वास संपादन करून घातला गंडा

Sangamner News:  राहता तालुक्यातील वयोवृद्ध महिलेला संगमनेरच्या अज्ञात तरुणाने गंडा घातल्याचे समोर आले आहे. संजय गांधी निराधार योजना मिळवून देण्याच्या नावाखाली दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना संगमनेर शहरात घडली आहे.

Cheating on a woman Kela Pobara with jewellery

संगमनेर:   राहता तालुक्यातील वयोवृद्ध महिलेला संगमनेरच्या अज्ञात तरुणाने गंडा घातल्याचे समोर आले आहे. संजय गांधी निराधार योजना मिळवून देण्याच्या नावाखाली दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना संगमनेर शहरात घडली आहे.

मी संगमनेरातील सेतू कार्यालयात कामाला आहे. तुम्ही विधवा असल्याने तुम्हाला डोल (संजय गांधी निराधार योजना) चालू करून देतो.’ असे बसमधून प्रवास करताना भेटलेल्या ३०-३५ वर्षीय तरुणाने सांगत ७५ वर्षीय वयोवृद्ध महिलेचा विश्वास संपादन केला. हा तरुण महिलेला संगमनेर तहसील कार्यालय परिसरात घेऊन आला. त्याने महिलेस अंगावरील दागिने काढून ठेवायला सांगितले. हे दागिने घेऊन त्याने पोबारा केला. या प्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

७५ वर्षीय वयोवृद्ध महिला राहाता तालुक्यातील रहिवासी आहेत. गुरुवारी (दि. २५) त्या जुन्नर येथे भावाकडे जाण्यासाठी बाभळेश्वर बसस्थानकातून खेडला जाणाऱ्या बसमध्ये बसल्या. संगमनेरातून बहिणीला सोबत घेऊन त्या जुन्नरला जाणार होत्या. त्यावेळी त्यांच्या शेजारी ३०-३५ वर्षीय अनोळखी तरुण येऊन बसला. त्याने त्यांच्याशी ओळख काढली. मी तुमच्या मुलाला ओळखत असून त्याचे नाव त्याने सय्यद असल्याचे सांगितले. मी संगमनेरातील सेतू कार्यालयात कामाला आहे. तुम्ही विधवा असल्याने तुम्हाला डोल (संजय गांधी निराधार योजना) चालू करून देतो. असे तो महिलेला म्हणाला. महिलेने होकार दिल्यानंतर ते दोघे संगमनेर बसस्थानकातून रिक्षाने सकाळी १०:३० च्या सुमारास संगमनेर तहसील कार्यालयाजवळ आले.

तुमच्या अंगावरील दागिने काढून पाकिटात ठेवा, डोल फक्त गरीब लोकांसाठी असतो. असे तो म्हणाला. त्यानंतर महिलेने गळ्यातील सोन्याची चेन, कानातील कर्णफुले, वेल आणि हातातील अंगठी काढत असे सर्व दागिने पाकिटात काढून ठेवले, ते पाकीट बॅगेत ठेवले. त्यानंतर तहसील कार्यालयाजवळ एका मिसळच्या हॉटेलमध्ये नेऊन तिथे त्याने बॅग ठेवण्यास सांगितले. महिलेने तसे केल्यानंतर तो सेतू कार्यालयात जाऊ. असे म्हणाला. त्याने महिलेला तहसील कार्यालयाबाहेर पायऱ्यांवर बसविले. मी कार्यालयात जाऊन चौकशी करून येतो. असे म्हणत तो निघून गेला. दागिने ठेवलेली बॅग उचकून पाहिली असता त्यात सोन्याचे दागिने ठेवलेले पाकीट आढळून आले नाही.

Web Title: Cheating on a woman Kela Pobara with jewellery

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here