अहमदनगर: नजर चुकवून हातचलाखीने एटीएम कार्ड बदलवून ७९ हजार रुपयांची फसवणूक
Breaking News | Ahmednagar: तालुक्यांत बनावट एटीएम कार्डचा वापर करून फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना पारनेर पोलिसांनी गजाआड केले.
पारनेर: मागील महिन्यात पारनेर व शेवगाव तालुक्यांत बनावट एटीएम कार्डचा वापर करून फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना पारनेर पोलिसांनी गजाआड केले आहे.
याप्रकरणी अमोल भगवान शेंडे (वय ३५ वर्षे, रा. काटी. ता. इंदापूर) व मल्हारी दत्तात्रय शेंडगे (वय ३४, वनगळी, ता. इंदापूर) या दोघांना पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ३१ हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या दोन्ही आरोपींनी शेवगावात बनावट एटीएम कार्डच्या माध्यमातून ७९ हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची कबुली दिली आहे. दोन्ही आरोपींनी फिर्यादीला पैसे काढता येत नाही काय, असे म्हणून एटीएम कार्ड घेऊन व नजर चुकवून हातचलाखीने कार्ड बदलून फसवणूक केली.
पारनेर पोलिसांनी या दोन्ही आरोपीकडून तीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन व रोख रक्कम हस्तगत केली आहे. पारनेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक समिर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो हँ का शामसुंदर गुजर पुढील तपास करत आहेत .
Web Title: Cheating of 79 thousand rupees by changing the ATM card
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study