Home महाराष्ट्र व्हाटस अॅपवर चॅट केल्याने पित्याने जन्मदात्या दोन मुलींना ट्रकखाली चिरडले

व्हाटस अॅपवर चॅट केल्याने पित्याने जन्मदात्या दोन मुलींना ट्रकखाली चिरडले

Chatting on the WhatsApp the father crushed the two daughters

पुणे: मुलगी व्हाटस अॅपवर कोणत्या तरी मुलाशी बोलते या कारणामुळे जन्मदात्या पित्याने पोटच्या दोन मुलींना ट्रकखाली झोपवून मुलींच्या अंगावरून ट्रक चालविला. त्यानंतर त्याच धावत्या ट्रकखाली उडी घेऊन बापानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील इंदोरी गावात रविवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली आहे.

नंदिनी भरत भराटे वय १८, वैष्णवी भरत भराटे वय १४, भरत ज्ञानदेव भराटे वय ४० सर्व रा. अल्फानगरी इंदोरी ता. मावळ जि. पुणे अशी मयतांची नावे आहेत. मयत मुलीची आई सपना भरत भराटे यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधीक माहिती अशी की, भरत भराटे हे मुळचे रहिवासी सोलापूर जिल्ह्यातील करमळा येथील आहे. भरत यांना तीन मुली आहेत. तिसरी सर्बात लहानी मुलगी तिरुमाला असे तिचे नाव आहे.

फिर्यादी सपना शनिवारी सकाळी कंपनीत कामावर गेल्या होत्या. घरात पती भरत व या तीन मुली होत्या. सायंकाळी मी घरी आल्यानंतर पती भरत याने सांगितले नंदिनीचा मोबाईल मी तपासाला असता कोणत्या तरी मुलाबरोबर व्हाटस अॅपवर चॅट करत होत्या. त्यामुळे नंदिनी आणि वैष्णवीला मारहाण केली असल्याचे सांगितले. त्यानंतर भरत यांनी वहीवर काहीतरी लिहून त्यांनी फिर्यादिना सही करण्यास सांगितले मात्र मात्र वही मजकूर वाचू दिला नाही. शनिवारी रात्री सर्वजण झोपी गेले असता रात्री बारा वाजण्याच्या सुमारास भरत झोपेतून उठले. त्यांनी नंदिनी व वैष्णवी हिला घराबाहेर नेले. मुलींना फिरण्यासाठी बाहेर नेले असावे असे फिर्यादीला वाटले. थोड्याच वेळात ट्रक चालू झाल्याचा आवाज आला. भरत यांनी स्वतःच्या मालकीचा ट्रक मुलींच्या अंगावरून चालविला व त्याच ट्रकखाली उडी घेऊन आपले जीवन संपविले असे फिर्यादीने नमूद केले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.

Web Title: Chatting on the WhatsApp the father crushed the two daughters

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here