Rain: मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
Rain Alert: येत्या चार दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह गडगडाट होण्याची शक्यता.

मुंबई: श्रावण सुरू झाला आणि मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतली. परंतु आता हवामानातील उल्लेखनीय बदलामुळे येत्या चार दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागात विजांच्या कडकडाटासह गडगडाट होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात देशासाठी सरासरी ४२ सेमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र, या वर्षी महाराष्ट्रात पाऊस हा ऑगस्टच्या सरासरी किंवा सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता ३५ ते ४५ टक्के जाणवते, अशी माहिती हवामान विभागाचे माजी अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली.
राज्यात ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा जरी कमी दिसत असले तरी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत मिळून राज्यात पावसाचे ऑगस्ट – सप्टेंबर या शेवटच्या प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असेल, असे दोन महिन्यांत देशासाठी सरासरी ४२ भारतीय हवामान शास्त्र विभागाचे सेमी पाऊस अपेक्षित असतो. अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद ऑगस्टमध्ये देशासाठी सरासरी २५ होसाळीकर यांनी सांगितले.
Web Title: Chance of heavy rain in Madhya Maharashtra