केंद्रसरकारचा साखर निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी हानीकारक: शरद पवार
Ahmednagar News | अहमदनगर: सध्या साखरेचे उत्पादन अधिक आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी संधी होती. मात्र केंद्रसरकारने साखरेच्या निर्यातीवर घातलेली बंदी शेतकऱ्यांच्या हिताचे नाही असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad pawar) यांनी व्यक्त केले.
माजी केंद्रीय राज्यमंत्री तसेच महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष बबनराव ढाकणे यांच्या यांच्यावरील “विधिमंडळातील बबनराव ढाकणे” या ग्रंथांचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. तसेच केदारेश्वर सहकारी साखर कारखाना इथेनोल प्रकल्पाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले सध्या नुसती साखर निर्माण करून चालणार नाही तर इथेनोल सारखे प्रकल्प पर्याय म्हणून निवडावे लागणार आहेत. आयुष्यभर बबनराव ढाकणे यांनी जनतेची सेवा केली. त्यांनी विविध पदांवर कामे केली. जनतेला न्याय देण्याचे काम त्यांनी केले. त्यांचा वारसा प्रतापराव पुढे चालवत आहे. तरुणांनी त्यांच्या मागे ताकद उभी करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केलं.
Web Title: Central government’s decision to ban sugar exports is detrimental to farmers sharad pawar