Home नाशिक संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर तीन वाहनांतून १५ लाख ९३ हजार रुपयांची रोकड...

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर तीन वाहनांतून १५ लाख ९३ हजार रुपयांची रोकड जप्त

Breaking News | Cash Seized:  नाशिक-पुणे महामार्गावर  तीन वाहनांतून १५ लाख ९३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

Cash worth Rs 15 lakh 93 thousand seized from three vehicles

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे नाक्यावर स्थानिक गुन्हे शाखा व तपासणी पथकाकडून गुरुवारी (दि.७) दुपारच्या सुमारास तीन वाहनांतून १५ लाख ९३ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. सदर रोकड सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील टोमॅटो व्यापाऱ्याची आणि एका उद्योजकाची असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सिन्नरच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सदर रक्कम आणि रिपोर्ट जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग केली असून सुनावणीत पुरावे तपासून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पोलिस आणि इतर प्रशासकीय यंत्रणेकडून तालुक्यात शिर्डी महामार्गावर पाथरे, पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे व नाशिक महामार्गावर चिंचोली परिसरात चेक पोस्ट लावून वाहनांची तपासणी केली जात आहे. गुरुवारी पुणे-नाशिक महामार्गाने संगमनेर येथून लाखोंची रोकड नाशिक जिल्ह्यात येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरिक्षक संदेश पवार, सहाय्यक उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलिस शिपाई विनोद टिळे यांनी सकाळपासून नांदूरशिंगोटे चेक पोस्टवर ठाण मांडून बसले होते.

यावेळी नाशिक जिल्ह्यात येणाऱ्या सर्व संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. दुपारच्या सुमारास दोन वाहनांना थांबवून तपासणी केली असता चालक बबलु अली मंहमद शेख (रा. संगमनेर) याच्या ताब्यात ६ लाख ७३ हजार ९९० रुपयांची तर शहबान रिजवान शेख (रा. संगमनेर) याच्या ताब्यात ६ लाख ७० हजार अशी एकुण १३ लाख ४३ हजार ९९० रुपयांची रोकड मिळाली. सदर रोकड जप्त करून दोघांना सिन्नर विधानसभा मतदार संघाचे निवडणुक निर्णय अधिकारी रवींद्र भारदे यांच्या ताब्यात देण्यात आले. बबलु आणि शहबान यांची चौकशी केली असता त्यांच्याकडील रोकड सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील एका टोमॅटो व्यापाऱ्याची असल्याचे समजले. त्यानंतर अन्य एका तिसऱ्या वाहनात अडीच लाख रुपयांची रोकड मिळून आली. सदर रक्कम एका उद्योजकाची असून कामगारांच्या पगारासाठी सदर रोकड नेली जात असल्याचे समजते. तिन्ही वाहनात एकूण १५ लाख ९३ हजार ९९९ रुपये मिळून आले. या तिन्ही वाहनातील रोकडचे रिपोर्ट जिल्हास्तरीय समितीकडे पाठवण्यात आल्याची माहिती तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र देशमुख यांनी दिली. अधिक तपास सुरु आहे. 

Web Title: Cash worth Rs 15 lakh 93 thousand seized from three vehicles

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here