संगमनेरात दुचाकी अडवून रोकड लांबविली, ५ जणांविरुद्ध गुन्हा
Breaking News | Sangamner Crime: पाच चोरट्यांनी शीतपेय विक्री करणाऱ्या व्यवसायिकाची दुचाकी अडवून ३ हजार २०० रुपयांची रोकड लांबविली.
संगमनेर: संगमनेर पाच चोरट्यांनी शीतपेय विक्री करणाऱ्या व्यवसायिकाची दुचाकी अडवून ३ हजार २०० रुपयांची रोकड लांबविली. शहरातील अकोले बाह्य वळण रस्त्यावरील बीएड कॉलेज समोर बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी पाच चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांच्या मुसक्या आवळल्या आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत अनंत दिगंबर कल्याणकर (रा. गुंजाळवाडी) यांचे शहरालगतच्या ढोलेवाडी गावाच्या शिवारात ऋषिकेश एजन्सी नावाचे शितपेय होलसेल विक्रीचे दुकान आहे. बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुकान आटोपुन दुकानातील दिवसभर जमा झालेली ६० हजार रुपयांची रक्कम बॅगमध्ये टाकून ते दुकानातील कामगार आकाश प्रल्हाद बोर्डे याला सोबत घेऊन ते आपल्या (एमएच १७ बीटी ४०३७) क्रमांकाच्या दुचाकीवरून त्यांच्या घरी जात होते. तेव्हा पाच इसमापैकी तिघांनी कल्याणकर यांच्याजवळ ठेवलेली बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. इतर दोघे जण हे पाठीमागे बसलेल्या कामगाराला पकडत होते. परिस्थितीचा अंदाज घेऊन कल्याणकर यांनी गाडी वेगात घेतली. यावेळी एका चोरट्याने त्यांच्या शर्टच्या खिशात असलेले तीन हजार दोनशे रुपये हिसकावून घेतले. त्यामुळे घाबरलेल्या कल्याणकर यांनी गाडी वेगात पुढे नेली. याबाबत अनंत कल्याणकर यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्याद दाखल होताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. त्यानंतर तिघांच्या मुसक्या आवळल्या आहे. यामध्ये करण सुनील आव्हाड, आशुतोष सुभाष राहणे, विशाल किरण कोळी यांना काल रात्रीतून ताब्यात घेतले आहे.
Breaking News: Cash was stolen by stopping a bike in Sangamner, case against 5 people