माजी उप सरपंचाकडे सापडली ३७ लाखांची रोकड
Breaking News | Election Commision: उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून ३६ लाख ९० हजार ५०० हजारांची रोकड जप्त करण्यात आली.
पिंपरी : तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमाटणे येथे अजित पवार गटाचा पदाधिकारी तथा माजी उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून ३६ लाख ९० हजार ५०० हजारांची रोकड जप्त करण्यात आली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी रविवारी सायंकाळी ही कारवाई केली असून, मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.
सचिन शाबू मुहे असे रोकड जप्त केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने विविध ठिकाणी पथकांकडून तपासणी केली जात आहे. सोमाटणे येथील माजी उपसरपंच सचिन मुन्हे यांचा जमीन खरेदी-विक्री आणि स्टीलचा व्यवसाय आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांना सोमाटणे येथे मुहे यांच्या कार्यालयात मोठी रोकड असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, तळेगाव पोलिस आणि भरारी पथकाने मुहे यांच्या कार्यालयावर छापा टाकला. तेव्हा कार्यालयात ठेवण्यात आलेल्या बॅगांमध्ये काही साड्या आणि ३६ लाख ९० हजार ५०० रुपयांची रोकड आढळून आली. मुन्हे यांना रकमेबाबत समाधानकारक उत्तर देता न आल्याने रोकड जप्त करण्यात आली. याबाबत निवडणूक विभाग आणि प्राप्तीकर विभागाला कळविण्यात आले आहे.
Web Title: Cash of 37 lakhs was found with the former deputy sarpanch
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study