संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल, प्रकरण काय?
Breaking News | Nandgaav Crime: खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका.
नांदगाव: शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्याचा निषेध करत भारतीय जनता पक्षाचे तालुका मंडल अध्यक्ष संजय सानप नेतृत्वाखाली नांदगाव पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यावरून नांदगाव पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्याविरुद्ध केलेले हे वक्तव्य केवळ वैयक्तिक टीका नसून, राजकीय सूडबुद्धीने प्रेरित, सामाजिक शांतता आणि कायद्याला धोका पोहोचवणारे आहे. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांच्या व्यक्तिगत आणि राजकीय प्रतिमेला गंभीर हानी पोहोचली आहे.
दरम्यान, याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात शातंता भंग होईल अशा हेतूने अपमान,फौजदारी धमकी कलमानुसार खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संजय सानप,रेखा शेलार, सतिष शिंदे, तारा शर्मा, बळवंत शिंदे, दिनेश जेजूरकर, कृष्णा देहडाराय, गणेश शर्मा, नितीन रावअंदोरे, उमेश सरोदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Breaking News: Case registered against Sanjay Raut