Home अहिल्यानगर अहिल्यानगर: बेकायदा खासगी सावकारी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर: बेकायदा खासगी सावकारी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Breaking News | Ahilyanagar Crime: अवैधरित्या खासगी सावकारी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल.

Case registered against illegal private moneylender

पारनेर: अवैधरित्या खासगी सावकारी करणाऱ्या निघोज येथील रंगनाथ किसनराव वराळ याच्याविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दूध उत्पादक शेतकरी मंगेश वराळ यांनी सहायक निबंधकांकडे तक्रार केली होती.

त्या आधारे चौकशी केल्यानंतर पारनेर पोलिसांनी रंगनाथ किसनराव वराळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवशे यांनी २७ जून रोजी पारनेरचे सहायक निबंधक विकास जाधव यांना चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर एक महिन्यांननंतर खासगी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक निबंधक शुभांगी रवींद्र सराफ (वय ४२) यांनी रविवारी (ता. ३) फिर्याद दिली.

मंगेश सखाराम वराळ (वय ४२, रा. निघोज) यांनी २०१९ मध्ये रंगनाथ वराळ याच्याकडून २५ लाख रुपये २ टक्के व्याजाने घेतले होते. त्यासाठी त्यांनी आपल्या शेतीचे खरेदीखत शीतल मंगेश वराळ यांच्या नावे करून ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर एक वर्षाचा सोडबोली करारनामा केला होता. मंगेश वराळ यांनी १६ महिने न चुकता ५० हजार रुपये व्याज देऊन ८ लाख रुपये दिले. त्यानंतर त्यांनी वराळ याच्याकडून पुन्हा २० लाखांचे कर्ज घेतले. त्यामुळे कर्जाची एकूण रक्कम ४५ लाख रुपये झाली. व्याजासह ही रक्कम ६० लाख रुपये झाल्याचे सांगून रंगनाथ वराळ याने मंगेश वराळ यांचे १ हेक्टर ६७ गुंठे क्षेत्र त्यांच्या मुली निमा व नीता यांच्या नावे ९ सप्टेंबर २०२१ रोजी दस्त नोंदवले. मात्र, दुसऱ्या कर्जाची रक्कम दिल्यावरही पहिल्या जमिनीचे खरेदीखत सोडबोली कराराप्रमाणे रद्द न केल्याने हा व्यवहार बेकायदा ठरल्याची तक्रार मंगेश वराळ यांनी केली होती. त्यानुसार, चौकशी करून रंगनाथ वराळ याच्याविरोधात बेकायदा सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक समीर बारवकर करत आहेत.

Breaking News: Case registered against illegal private moneylender

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here