अहिल्यानगर: ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर
Breaking News | Ahilyanagar Crime: ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. ताब्यात देखील घेण्यात आले आहे.
अहिल्यानगर: गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठे धक्के बसत आहे आता अहिल्यानगर येथून एक मोठा धक्का बसला आहे. अहिल्यानगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ठाकरे गटाच्या बड्या नेत्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नेत्याचे नाव किरण काळे आहे. किरण काळे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहिल्यानगर शहरप्रमुख आहे. किरण काळेवर अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात एका एकवीस वर्षीय विवाहित महिलेने गुन्हा दाखल केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित महिला आणि तिचा पती त्यांच्यात सतत वाद होत होते. याला मदत मिळण्याकरिता पीडित महिला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे एकमेकांच्या संपर्कात आले होते. पीडित महिलेला मदत करण्याचे आमिष दाखवून शहर प्रमुख किरण काळे याने महिलेवर बलात्कार केला. २०२३ ते २०२४ पर्यंत किरण काळे याने स्वतः च्या संपर्क कार्यालयात बलात्कार केला. तसेच ही गोष्ट कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा किरण काळेने दिल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.
पीडित महिलेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात किरण काळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण काळेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. किरण काळेंवर गुन्हा दाखल झाल्याने ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Breaking News: case of abused has been registered against a senior leader of the Thackeray group.