पहाटे तीनला बेज वाजवली, महिला डॉक्टरच्या घरात 35 वर्षीय डॉक्टर शिरला अन्…
Breaking News | Pune Crime: पुरुष डॉक्टरने महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.
पुणे : पुरुष डॉक्टरने महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरात ही हादरवणारी घटना घडली आहे. पीडित महिला आणि आरोपी डॉक्टर हे एकाच सोसायटीमध्ये राहतात. 8 मे रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास आरोपी जबरदस्ती महिला डॉक्टरच्या घरात घुसून विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पीडित डॉक्टरने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी डॉ. दीपक बालाजी ढवळे, वय 35 वर्ष, रा. कदम हाइट्स, शिवशंभो नगर, भारती विद्यापीठ, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला डॉक्टर, वय 28 वर्ष यांच्याकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, , 8 मे रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला डॉक्टर झोपेत असताना आरोपीने त्यांच्या घराची बेल वाजवली. दरवाजा उघडल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्याने फिर्यादीला ढकलून दिले व ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना तिला कानाखाली मारले. त्यानंतर तिचा हात पकडून जवळ ओढण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक थोरात करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी डॉक्टर यांच्यात पूर्वीपासून ओळख होती. ते एकाच इमारतीत राहतात. मात्र, असा प्रकार का घडला याचा तपास सध्या सुरू आहे.
Breaking News: case of male doctor molesting female doctor