वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याने गुन्हा दाखल
Breaking News | Pune Crime: पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार.
पिंपरी चिंचवड: पत्नीला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या पती आणि सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सावत्र सासऱ्यानेही पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १८ सप्टेंबर रोजी कासारवाडी येथे उघडकीस आली.
याबाबत ३२ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. २०) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पीडित महिलेचा पती आणि सावत्र सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आणि सावत्र सासऱ्याने फिर्यादी यांना एक अॅप त्यांच्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्यानंतर पीडित महिलेच्या मोबाइलवर एका ग्राहकाने संपर्क केला असता, आरोपीने पीडित महिलेला जबरदस्तीने वेश्या व्यवसायासाठी पाठविले. त्यातून मिळणाऱ्या पैशाचा स्वतःसाठी व कुटुंबासाठी खर्च केला. पीडित महिलेने आरोपींना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केली; तसेच आरोपी सावत्र सासरा यानेही पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अधिक तपास भोसरी पोलीस करीत आहे.
Web Title: case has been registered for abetting prostitution
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study