संगमनेर: चौकात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यावर गुन्हा दाखल
Breaking News | Sangamner: घरात घुसण्याचा प्रयत्न करून त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी.
संगमनेर: संगमनेर शहरातील सिद्धिविनायक कॉलनी, साईद्धा चौक येथील रहिवाशी असणान्या नितु ब्रिजेशकुमार सिंग यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करून त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मधुकर चंद्रकांत वर्ष उर्फ भोल्या याचेवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दि. २४ फेब्रुवारी रोजी भा.द. वि. ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
शहरात काही तरुण पिऊन धिंगाणा घालून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे. रात्री अपरात्री हालात समय घेऊन नागरीकांना भीती दाखवून दहशत निर्माण करण्याच्या घटना यापुर्वी देखील घडलेल्या आहेत. पोलीसांनी दहशत निर्माण करणाचा प्रवृतीचा कायमचा बंदोबस्त करण्याची स्थानिक नागरिकांतून मागणी होत आहे.
Web Title: case has been registered against the drunken and disorderly person
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study