महिलेला धमकावून बलात्कार, लष्करी जवानाविरुद्ध गुन्हा दाखल
Pune Crime: एका जवानाचे धक्कादायक कृत्य समोर आले आहे. महिलेला धमकावून बलात्कार (Rape) केल्याची घटना.
पुणे : एका लष्करी जवानाने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका लष्करी जवानाविरुद्ध सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बळीराम माधवराव गुट्टे (वय ३५, मूळ रा. बीड सध्या नेमणूक भोपाळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी बळीराम भोपाळ येथील इंजिनीयर रेजिमेंटमध्ये नियुक्तीस आहे. पीडित महिला त्याच्या ओळखीतील आहे. बळीराम महिलेच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने महिलेच्या नकळत मोबाइलवर चित्रीकरण केले. ते प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने महिलेवर बलात्कार केला. बळीराम याच्या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेने अखेर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.
Web Title: case has been registered against an army man for rape a woman
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App