Home क्राईम वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या  महिलेचा पर्दाफाश,  पोलिसांचा छापा

वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या  महिलेचा पर्दाफाश,  पोलिसांचा छापा

स्व: मालकीच्या रूममध्ये २२ वर्षीय महिलेकडून वेश्याव्यवसाय (Prostitution) करून घेणाऱ्या महिलेवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

case has been registered against a woman engaged in Prostitution Narayangaon police action

नारायणगाव (पुणे) : धनगरवाडी गावच्या हद्दीतील येडगाव रोडलगत असलेल्या स्व: मालकीच्या रूममध्ये २२ वर्षीय महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या महिलेवर नारायणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुनीता प्रवीण वाजगे (५३) रा. धनगरवाडी ता. जुन्नर) या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनगरवाडी गावच्या हद्दीतील येडगाव रोडलगत राहण्यास असलेल्या सुनीता वाजगे हिने तिच्या मालकीच्या रूममध्ये स्वतःच्या फायद्यासाठी वेश्याव्यवसाय चालविला आहे. पोलिसांनी सापळा रचून छापा मारला असता त्या ठिकाणी २२ वर्षीय महिला मिळून आली. पोलिसांनी वाजगे हिला ताब्यात घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो. नि. पृथ्वीराज ताटे, महिला पोलिस प्रियंका लोंढे, पोलिस नाईक दिनेश साबळे, मंगेश लोखंडे, कॉन्स्टेबल सचिन कोबल, गोरक्ष हासे, शैलेश वाघमारे, पूजा शहा यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: the case has been registered against a woman engaged in Prostitution Narayangaon police action

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here