Home अहमदनगर कोपरगावात रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

कोपरगावात रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

Breaking News | Maratha Reservation:  सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन केले असता आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल.

case has been filed against Maratha Reservation community activists after the road stop movement

कोपरगाव: मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गावागावांत रास्ता रोको करण्याचे घोषित केल्याने त्यांच्या आव्हानावरून कोपरगाव शहरातील साईबाबा कॉर्नर येथे आणि तालुक्यातील धामोरी बस स्थानक येथे सकल मराठा समाज बांधवांच्यावतीने रास्ता रोको आंदोलन केले असता आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध कोपरगाव शहर व तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या रास्तारोको आंदोलनामुळे शहरातून जाणारा नगर मनामड महामार्गावर वाहनाच्या लांबच्या लांब रांगाच्या रांगा लागल्या होत्या. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेऊन रस्त्यावर उतरलेले होते. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या जमाव बंदी कायद्याचे उल्लंघन केले असल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.कॉ. श्रीकांत बाळू कुन्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल गायकवाड, विनय भगत, बाळासाहेब जाधव, विकास आढाव, बाळासाहेब देवकर, सुनिल साळुंके, संदीप डुंबरे व इतर ५ ते ७ सर्व रा. कोपरगाव यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम १८८, महा. पो. अधी. क. ३७(१) (३)/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील धामोरी येथील आंदोलकांवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पो.कॉ. युवराज मारुती खुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण संपतराव भाकरे, ज्ञानदेव दगुजी मांजरे, सुनिल शिवाजी गांजरे, नारायण बारकू मांजरे, सचिन जना कुन्हाडे, शिवाजी काशिनाथ वाघ, सुनिल विष्णु वाणी, अशोक दशरथ भाकरे, प्रकाश विश्वनाथ वाघ व इतर २० ते २५ जन सर्व रा. धामोरी ता. कोपरगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: case has been filed against Maratha Reservation community activists after the road stop movement

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here