अकोले: ठेकेदाराच्या आत्महत्याप्रकरणी सात जणावर गुन्हा दाखल
Breaking News | Akole: कामाचे पैसे न देता शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कर्ज झाल्याने आपल्या वडिलांनी शारीरिक, आपली मानसिक, आर्थिक जाचाला कंटाळून जीवनयात्रा संपविली.

अकोले: कामाचे पैसे न देता शिवीगाळ करून मारहाण केली. त्यामुळे त्यांच्यावर कर्ज झाल्याने आपल्या वडिलांनी शारीरिक, आपली मानसिक, आर्थिक जाचाला कंटाळून जीवनयात्रा संपविली अशी तक्रार चोवीसवर्षीय अभियंता संकेत जगन्नाथ कानवडे यांनी अकोले पोलिसांत दिली आहे. यावरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अनेक प्रतिष्ठित मान्यवरांचा समावेश असल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मयत जगन्नाथ कानवडे (वय ४८, ह. रा. महालक्ष्मी रोड, अकोले, मूळ रा.सावरचोळ, ता. संगमनेर) या सेंट्रींग काम करणाऱ्या ठेकेदाराने २३ ऑक्टोबरला गणोरे येथे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत प्रथम संपत कानवडे (रा. सावरचोळ, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या खबरीवरून अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मयत कानवडे यांचा मुलगा संकेत यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी संदीप वाकचौरे, शेखर वाकचौरे, दोघांचे वडील रमेश वाकचौरे सर्व रा. गणोरे), अशोक वाकचौरे (रा. कळस, धीरज ऍग्रो), श्रीकांत आंबरे (रा. गणोरे), रावसाहेब वाकचौरे, दिनेश वाकचौरे (दोघेही रा. आनंदगड, वीरगाव) या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक ५३१/२०२५, बी.एन. एस. कलम १०८, ११८(२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहे. तब्बल सहा दिवसांनंतर वरील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
Breaking News: Case filed against seven people in contractor’s suicide case
















































