अहमदनगर: लाच मागितल्या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल विरोधात गुन्हा
Breaking News | Ahmednagar: तक्रार अर्जाच्या चौकशीवरून कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या शेवगाव पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल विरोधात गुन्हा दाखल.
शेवगाव: तक्रार अर्जाच्या चौकशीवरून कारवाई न करण्यासाठी लाच मागणाऱ्या शेवगाव पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शेवगाव पोलिस ठाणे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे.
पांडुरंग बाबुराव वीर असे लाच मागणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील इसमाने लाचलुचपत विभागाकडे वीर यांच्या विरोधात ५ ते १० हजार रुपये लाच मागितल्या प्रकरणी ११ मार्च २०२४ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. या अर्जाबाबत १२ मार्च रोजी लाचलुचपत विभागाने पंचांच्या समक्ष पडताळणी केली.
यावेळी वीर यांनी तक्रारदार यांच्यावर कारवाई न करण्यासाठी इतर पोलिसाने पाच-दहा हजार रुपये घेतले असते, द्यायचे तुमच्या मनाने, हिशेबाहिशेबाने द्या, असे म्हणून तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करून सदर लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार शुक्रवारी (दि. ३१) शेवगाव पोलिस ठाण्यात वीर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, छाया देवरे, पर्यवेक्षण अधिकारी प्रवीण लोखंडे, सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, चालक पोलिस हवालदार दशरथ लाड यांच्या पथकाने केली आहे.
Web Title: Case against police head constable for demanding bribe
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study