Home पुणे केअरटेकर तरुणीवर बियर पाजुन बलात्कार, संतापजनक घटना

केअरटेकर तरुणीवर बियर पाजुन बलात्कार, संतापजनक घटना

Breaking News | Pune Crime: केअर टेकरचं काम करणाऱ्या एका तरूणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक  घटना.

Caretaker girl raped by drinking beer

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत केअर टेकरचं काम करणाऱ्या एका तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. ज्या व्यक्तीच्या घरी तरूणी केअर टेकरचं काम करत होती, त्याच व्यक्तीने तिच्यावर घरात व लॉजवर नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आता प्रवीण बंब नावाच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुळची अहमदनगर जिल्ह्याची रहिवाशी असलेल्या एका 24 वर्षीय तरूणीच्या आई-वडिलांचे अपघाती निधन झाले होते. या निधनानंतर तरूणीने तिच्या आजीसोबत राहायला सुरूवात केली. मात्र कोरोनाच्या महामारीत तिच्या आजीचे देखील निधन झाले होते. त्यानंतर तरूणीचा सांभाळ तिच्या चुलत मामाने करायला सुरूवात केली होती.

चुलत मामाकडे राहण्यास गेल्यानंतर तरूणीने एका एजन्सीमार्फत पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात केअर टेकरची नोकरी करायला सुरुवात केली होती. या ठिकाणी तिला एका घरात दोन महिलांचा सांभाळ करायचा होता. हे काम करत असतानाच मालकाची तिच्यावर वाईट नजर पडली आणि त्याने तिला लॉजवर नेत बिअर पाजून तिच्यावर बलात्कार केला होता.

पीडित तरूणीने 4 महिन्यापूर्वी आरोपीच्या घरी कामास सुरूवात केली होती. या दरम्यान पत्नी घरी नसल्याची संधी साधत आरोपीने तरूणीला बेडरूममध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास गळा दाबून तुला मारून टाकीन अशी धमकीही दिली होती. यानंतर आरोपीने तिला कारमध्ये जबरदस्ती बसवून सिंहगड रोडने खडकवासला धरणाच्या पुढे एका लॉजवर नेले. यावेळी आरोपीने लॉजवर तरूणीला मारहाण करत जबरदस्ती बिअर पाजून तिच्यावर अत्याचार तसेच या घटनेची कुणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

दरम्यान आरोपीच्या या सततच्या छळाला कंटाळून पीडित तरूणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीनंतर आरोपी प्रवीण बंब (45) याला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Caretaker girl raped by drinking beer

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here