Home संगमनेर ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संगमनेरात गोमांसासह कार जप्त

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संगमनेरात गोमांसासह कार जप्त

Breaking News | Sangamner Crime:  ज्ञानमाता शाळेसमोर गोमांस वाहतूक करणारे वाहन पकडले. या कारवाईत 700 किलो गोमांस व कार असा एकूण 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Car with beef seized in Sangamner on the eve of Ganeshotsav 

संगमनेर:  ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने बुधवारी (दि. 27) मध्यरात्री एक वाजता ज्ञानमाता शाळेसमोर गोमांस वाहतूक करणारे वाहन पकडले. या कारवाईत 700 किलो गोमांस व कार असा एकूण 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, राज्यात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना देखील कारमधून (क्र. एम एच. 04, ए एक्स. 5571) सातशे किलो गोमांस वाहतूक करताना इमाम हुसेन शेख (वय 27, रा. जुन्नर, पुणे, मूळ रा. मुंबई), आवेश सलीम पठाण (वय 22, रा. जुन्नर), सद्दाम फकीर महंमद कुरेशी (रा. ममदापूर, राहाता), राजू नसीर इनामदार (रा. वेस, कोपरगाव) यांना शहर पोलिसांच्या पथकाने पकडले. या कारवाईत गोमांस आणि कार मिळून 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोकॉ. गणेश थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. पारधी हे करत आहे.

तर दुसर्‍या कारवाईत संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास दिल्ली नाका येथील पावर वजनकाट्याजवळ गोवंश जनावरांना दाटीवाटीने व चारा पाण्याविना डांबून ठेवून क्रूरतेने वाहतूक करताना एक वाहन पकडले. या कारवाईत 60 हजार रुपयांच्या चार गाईंची सुटका करत एक लाख रुपयांचे वाहन जप्त केले आहे.

याप्रकरणी पोकॉ. रामकिसन मुकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहंमद हुसेन फरीद शेख (वय 37), बबलू इंदू शेख व मोजीम उर्फ सलीम नसीर शेख (तिघेही रा. कुरण, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Breaking News: Car with beef seized in Sangamner on the eve of Ganeshotsav 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here