Home संगमनेर संगमनेरात कार चोरांनी केला चालकाचा खून, जंगलात फेकला मृतदेह

संगमनेरात कार चोरांनी केला चालकाचा खून, जंगलात फेकला मृतदेह

Breaking News | Sangamner: भाड्याने घेतलेली चारचाकी कार चोरण्याच्या उद्दश्वाने चालकाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पुणे – नाशिक महामार्गावरील संतवाडी शिवारातील आळेखिंड वनविभागाच्या जंगलात फेकून दिला.

Car thieves killed the driver in Sangamnera, threw the body in the forest

घारगाव: भाड्याने घेतलेली चारचाकी कार चोरण्याच्या उद्दश्वाने चालकाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पुणे – नाशिक महामार्गावरील संतवाडी शिवारातील आळेखिंड वनविभागाच्या जंगलात फेकून दिला. ही घटना मंगळवारी (दि.२८) दुपारी उघडकीस आली आहे. राजश्व बाबुराव गायकवाड (वय ५६, रा. निधी अपार्टमेंट, जेलरोड, नाशिक) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे.

सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुणे येथून चालक राजश्व गायकवाड हे कार (क्र. एमएच. १५. जेडी. ५१९३) पुणे ते सिन्नर एमआयडीसी असे भाडे घेवून येत असताना संतवाडी शिवारात (ता. जुजर, जि. पुणे) येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चालक गायकवाड यांचा हात पाठीमागील बाजूने नायलॉन दोरीने व जीप नायलॉन टायने (लॉक) बांधून ते चालवत असलेली कार चोरी करण्याच्या उद्दे-शाने गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह संतवाडी शिवारातील वन विभागाच्या ओड्यात टाकून दिला. याबाबत फिर्याद मृत चालक गायकवाड यांचा मुलगा अंकुश राजश्व गायकवाड याने आळेफाटा पोलीस ठाण्यात मंगळवारी दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला असून गायकवाड यांची कार नेमकी पुणे येथून कोणी भाड्याने घेतली होती याचा तपास सुरू आहे.

Web Title: Car thieves killed the driver in Sangamnera, threw the body in the forest

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here