Breaking News | Sangamner: रस्त्यावर उभ्या असलेल्या टाटा सफारी गाडीच्या वायरिंगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने या गाडीने पेट (fire) घेतल्याची घटना.
संगमनेर :- रस्त्यावर उभ्या असलेल्या टाटा सफारी गाडीच्या वायरिंगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने या गाडीने पेट घेतल्याची घटना काल शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील कॅप्टन लक्ष्मी चौकात घडली. गाडीला अचानक आग लागल्याने नागरिकांची धांदल उडाली.
याबाबत समजलेली माहिती अशी की शहरातील जाणता राजा मैदान परिसरात राहणारे उद्योजक पंकज जाजू यांनी आपली टाटा सफारी क्रमांक (एमएच ०४ जी २६२५) शहरातील रंगार गल्ली परिसरातील कॅप्टन लक्ष्मी चौकात लावली होती. आपली गाडी या ठिकाणी पार्किंग करून ते औषध घेण्यासाठी जवळच्या एका मेडिकल स्टोअरमध्ये गेले होते. या दरम्यान त्यांच्या टाटा सफारीला अचानक आग लागली. गाडीतील वायरिंग मध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे दिसत होती. गाडीला अचानक आग लागल्याने परिसरातील नागरिकांची धांदल उडाली, या नागरिकांनी गाडीवर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. यानंतर नगरपालिकेच्या फायर फायटरला बोलावण्यात आले. या आगीमध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले.
Web Title: car parked in Sangamner at Chowk caught fire
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study