पैशाच्या वादातून कारला दुसऱ्या वाहनाने दिली धडक; एक ठार
Breaking News | Ahilyanagar: पैशांच्या वादातून कारला पाठीमागून दुसऱ्या कारने जोरात धडक मारून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू.

राशीन: पैशांच्या वादातून कारला पाठीमागून दुसऱ्या कारने जोरात धडक मारून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला.
करमाळा रस्त्यावर मंगळवारी (दि. २८) रात्री ही घटना घडली. चंद्रशेखर रामदास जाधव (वय २८, हल्ली रा. राशीन) असे मृताचे नाव आहे. कर्जत पोलिस ठाण्यात बुधवारी तेजस संजय काळेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राशीन येथील चंद्रशेखर जाधव आणि तेजस संजय काळे (रा. कानगुडवाडी) यांच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद होता. मंगळवारी (दि.२८) रात्री चंद्रशेखर व तेजस यांच्यात करमाळा रस्त्यावरील एका हॉटेलसमोर त्यातून बाचाबाची झाली. चंद्रशेखर जाधव हा कारमधून तेथून निघाला. तेजस याने कारने त्याचा पाठलाग सुरू केला. चिलवडी शिवारात करमाळा रस्त्यावर तेजस याने चंद्रशेखर याला गाठले. तेथे समोर जाणाऱ्या चंद्रशेखरच्या कारला पाठीमागून जोरात दोन ते तीन वेळा धडक दिली. त्यामुळे चंद्रशेखर याची कार उलटून तो गंभीर जखमी झाला. त्याला राशीनमधील दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
Breaking News: Car hit by another vehicle over money dispute one killed
















































