Home Accident News Accident: नाशिक पुणे महामार्गावर नांदूर शिंगोटे शिवारात कारची ट्रकला धडक, ३ जण...
Accident: नाशिक पुणे महामार्गावर नांदूर शिंगोटे शिवारात कारची ट्रकला धडक, ३ जण ठार
संगमनेर | Accident: पुणे नाशिक महामार्गावर कर्हे घाटाजवळ नांदूर शिंगोटे शिवारात संगमनेरकडून नाशिक जाणारी स्विफ्ट कार भरधाव वेगात रस्त्याच्या बाजूला हॉटेल अन्वितासमोर उभ्या असलेल्या आयशर ट्रकला धडकली. या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले.
बुधवारी पहाटे हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्विफ्ट कारच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला.
शरद गोविंदराव महाजन रा. नाशिक, भूषण बाळकृष्ण बदान रा. नाशिक, राजेश तिवार रा. कल्याण हे तिघे जण जागीच ठार झाले. कार गाडीचाही चक्काचूर झाला आहे. शिरसाठ यांच्या मदतीने मृतदेह गाडीतून बाहेर काढण्यात आली.
Web Title: car hit a truck on Nandur Shingote Shivara on Nashik-Pune highway