पुणे-नाशिक महामार्गावर तीन वाहनांच्या धडकेत कारने पेट घेतली अन् तिघांचा होरपळून मृत्यू
Breaking News | Pune Accident: टेम्पो पुढे उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकला. तर स्विफ्ट कारने पेट (fire) घेतला. या भीषण अपघातात पेटत्या कारमधील तिघांचा होळपळून मृत्यू (Death) झाल्याची घटना.
मंचर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक कंटेनर बंद पडला होता. या मार्गावर सकाळी टेम्पो आणि स्विफ्ट कारमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर टेम्पो पुढे उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकला. तर स्विफ्ट कारने पेट घेतला. या भीषण अपघातात पेटत्या कारमधील तिघांचा होळपळून मृत्यू झाला आहे.
शनिवारी पहाटे मंचरजवळ असलेल्या भोरवाडी येथे हा विचित्र अपघात झाला. या अपघातात स्विफ्टकार जागीच जळून खाक झाली. यामुळे या गाडीतील तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने कारचा चालक आणि टेम्पोचा चालक अपघातातून बचावले.
पुणे – नाशिक महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर एक कंटेनर बंद पडला होता. या मार्गावर सकाळी टेम्पो आणि स्विफ्ट कारमध्ये जोरदार धडक झाली. त्यानंतर टेम्पो पुढे उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकला. तर स्विफ्ट कारने पेट घेतली. त्यात स्विफ्ट गाडी पूर्णतः जळून खाक झाली आणि गाडीतील तिघांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. मंचर येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रस्त्यावर असलेली अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या मदतीने बाजूला केली. त्यानंतर पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली.
मृत्यू झालेले तिघे जण खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील आहेत. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मंचर पोलीस करत आहेत.
Web Title: car caught fire in a collision between three vehicles and three died on the spot
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study