संगमनेर: गोमांस वाहतूक करणाऱ्या कारचा अपघात, चालक ठार
Sangamner Accident news: भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने एका अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात गोमांस कार चालक ठार.
संगमनेर: गोमांसाची तस्करी करून भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने एका अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात गोमांस कार चालक ठार झाल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास नाशिक – पुणे महामार्गावरील माळवाडी शिवारात घडली.
गोवंश कत्तल करण्यावर बंदी असताना संगमनेरात मात्र अवैध पद्धतीने अनेक कत्तलखाने सुरु आहेत. रात्रीच्या वेळी येथील कत्तल खाण्यात मोठ्या प्रमाणावर गोवंशची कत्तल करून त्याचे मांस परजिल्ह्यात पाठवले जाते. त्यासाठी आता महागड्या कारचा वापर केला जात आहे.
अशाच पद्धतीने स्विफ्ट कारमधून संगमनेरहून आळेफाटयाच्या दिशेने गोमांस घेऊन जात असणात्या कारने पाठीमागून एका अज्ञात वाहनाला धडक दिली. या भीषण अपघातात कार चालक जावेद शरफुद्दीन शेख (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) हा गंभीर जखमी झाला. त्याला ग्रामीण रुणात्त्यात उपचारासाठी दाखल केले असता त्याचे निधन झाले. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.
Web Title: Car carrying beef accident, driver killed
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App