संगमनेर: पुणे नाशिक हायवेवर कार व मोटारसायकलचा अपघात- Accident
Sangamner Accident: भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना. रायतेवाडी परिसरात ही घटना घडली. चंदनापुरी येथील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
संगमनेर: पुणे -नाशिक हायवेवर भरधाव वेगाने जाणार्या कारने मोटारसायकलला धडक दिल्याने दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना रायतेवाडी फाटा परिसरात घडली.
या घटनेत संपत तबाजी राहणे (वय 46) व दादा मार्तंड राहणे (वय 65, दोघे राहणार चंदनापुरी) हे जखमी झाले आहेत. चंदनापुरी येथील मुळगंगा दूध डेअरी मध्ये दूध टाकून मोटरसायकलने संगमनेरकडे रस्ता ओलांडून जात असताना नाशिक-पुणे महामार्गावरील रायतेवाडी फाटा परिसरात एम. एच. 14 जीएस 5676 या क्रमांकाच्या कारने त्यांना धडक दिली.
या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार साठी हलविण्यात आले आहे.
जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation. भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC. सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.
Web Title: Car and motorcycle accident on Pune Nashik highway
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App