Home अहमदनगर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारला अपघात; दोन युवकांचा मृत्यू

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारला अपघात; दोन युवकांचा मृत्यू

Ahilyanagar Accident: हांडेवाडी फाटा येथे चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना.

Car accident due to driver losing control Two youths died

कोपरगाव: राहात्याहून वणी दिंडोरीकडे जात असताना कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी फाटा येथे चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राहाता तालुक्यातील तिसगाव येथील रहिवासी असलेले सहा जण मारुती सुझुकी कंपनीच्या इको गाडीतून राहत्या कडून वणी-दिंडोरीकडे जात असताना कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी फाटा येथे वळणावर चालकाचे कारवरील नियंत्र सुटले. त्यामुळे कारने दोन पलट्या खाल्ल्याने भिषण अपघात झाला. यात संदीप बाळासाहेब सदाफळ (वय 35) राहणार तिसगाव वाडी ता. राहाता, ऋषिकेश मधुकर कडू (वय 24) राहणार तिसगाव वाडी ता. राहाता यांचा या अपघातात मृत्यू (Death) झाला. त्यांच्यासोबत असलेल्या चौघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते.

मृतांना तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डिकले यांनी मृत घोषित केले. तसेच त्यांच्यासोबत असलेले चौघावर रुग्णालयात उपचार सुरू होते. या घटनेबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ढिकले यांनी दिलेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Car accident due to driver losing control Two youths died

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here