अहिल्यानगर: प्रेयसीला भेटायला आला; अन घडले धक्कादायक
Breaking News | Ahilyanagar: चिंचेच्या बागेत रॉडने मारहाण : २० जणांवर गुन्हा दाखल.

श्रीरामपूर : नेवासा येथून श्रीरामपूरला प्रेयसीला भेटायला आलेल्या १९ वर्षीय शाहिद सादिक शाहा (रा. कुकाणा, ता. नेवासा) याला बेदम मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार श्रीरामपुरात घडला.
याबाबत शाहिद शाहा याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका तरुणीशी आपले प्रेम जुळले. आम्ही एकमेकांना भेटायचो. काही दिवसांपूर्वी तिने आपल्याला श्रीरामपूरला भेटायला बोलावले. तेव्हा आपण भेटायला आलो असता त्या ठिकाणी आरोपी व काही अनोळखी तरुण आले. त्यांनी आपल्या पुन्हा मोटारसायकलवर बसवून अशोकनगर फाट्याच्या पुढे हरेगावरोडला पाटाजवळ घेऊन गेले. तेथे आरोपींनी व तेथे असणाऱ्या अनोळखी तरुणांनी बेदम मारहाण करत चॉपरने जिवे मारण्याची धमकी दिली.
मित्राला धमकावून काढून दिले. त्यानंतर त्यांनी मोटारसायकलवर बसवून बोरावके महाविद्यालयाच्या पाठीमागे चिंचेच्या बागेत नेले. कंबरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली तसेच एकाने हातातील रॉडने पायावर, कंबरेवर मारले. त्यानंतर मोटारसायकलवर बसून हरेगाव फाटा येथे आणले. समोरून पोलिस गाडी दिसल्याने आरोपींनी तेथून पळ काढला. शाहिद शाहा फिर्यादीवरून वैभव कार्ले, प्रशांत मगर, अशोक उगले (सर्व रा. शिरसगाव, ता. नेवासा) व अन्य १८ ते २० अनोळखी तरुणांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Breaking News: Came to meet my girlfriend something shocking happened















































