गावाहून आली अन वसतिगृहात गळ्याला दोर लावला
Breaking News | Kolhapur Suicide: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात २१ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या, मुलींच्या वसतीगृहात गळफास लावून आयुष्य संपवलं. कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही.
कोल्हापूर: कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोरआली आहे. शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. विद्यापीठातील मुलींच्या वसतीगृहात तिनं गळफास घेऊन आयुष्य संपवलं. गावावरून परतल्यानंतर तिनं हे टोकाचं पाऊल उचललं. दरम्यान, तरूणीनं आत्महत्या का केली? याचं नेमकं कारण अस्पष्ट आहे. या घटनेनंतर शिवाजी विद्यापीठ परिसरात एकच खळबळ उडाली असून, कुटुंबियांवर दुखाःचा डोंगर कोसळला आहे.
गायत्री रेळेकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तरूणी मुळची सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात तरूणी भूगोल विभागात पहिल्या वर्षात शिकत होती. मुलींच्या वसतीगृहात रूम नंबर ५४मध्ये राहत होती. तिच्यासोबत इतर २ मुलीही राहत होत्या.
मृत्यूपूर्वी गायत्री तीन दिवसांसाठी गावी गेली होती. ११ ऑगस्ट रोजी ती सांगलीहून कोल्हापूरला परतली. नंतर तिनं वडिलांना फोन केला आणि वसतीगृहात गेली. त्यानंतर तिनं खोलीतच गळफास लावून आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास गायत्रीच्या मैत्रिणी वसतीगृहात पोहोचल्या. रूमचा दरवाजा ठोठावला. पण कुणीच दार उघडले नाही.
शंका आल्यानंतर मैत्रिणींनी खिडकीतून पाहिलं. तेव्हा त्यांना धक्काच बसला. गायत्रीनं ओढणीनं गळफास घेत आयुष्य संपवलं असल्याचं दिसलं. त्यांनी तातडीने सुरक्षारक्षकांना बोलावून घेतलं. सुरक्षारक्षाकांनी दरवाजा तोडून प्रवेश केला. तसेच राजारामपूरी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं.
Breaking News: came from the village and was hanged in the hostel