Home पुणे “तुझा वाढदिवस साजरा करतो” असे सांगून तिला हॉटेलमध्ये बोलावून अत्याचार

“तुझा वाढदिवस साजरा करतो” असे सांगून तिला हॉटेलमध्ये बोलावून अत्याचार

Breaking News | Chakan Crime: 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 26 वर्षीय तरुणाने चार महिन्यांत अनेकदा अत्याचार केल्याची घटना उघडकीस.

Called to a hotel and sexual abused

चाकणः चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेलपिंपळगाव येथील मोहितेवाडी (ता. खेड) या ठिकाणी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 26 वर्षीय तरुणाने चार महिन्यांत अनेकदा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान, आरोपी आसीम मुलानी (वय 26, रा. शेलपिंपळगाव) याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ शेलपिंपळगाव येथील स्थानिकांनी मोर्चा काढला.

आरोपी आसिम मुलाणी याने पीडित अल्पवयीन जबरदस्तीने मुलीवर 16 डिसेंबर 2024 ते 26 एप्रिल 2025 या कालावधीत वारंवार अत्याचार केला आहे. चार महिन्यांत अनेकदा जबरदस्तीने बलात्कार करून याबाबत कुणालाही काहीही सांगितल्यास तुला व तुझ्या घरच्यांना जीवे मारून टाकण्याची धमकी पीडित तरुणीला दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि. 26) पीडित मुलीला “तुझा वाढदिवस साजरा करतो” असे सांगून तिला आबासाहेब हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्या हॉटेलमध्येदेखील नराधमाने तिच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी कळल्यानंतर शेलपिंपळगाव येथील तरुणांच्या जमावाने आरोपी आसीम मुलानी यास जबर मारहाण केली.

घटनास्थळी पोहचलेल्या चाकण पोलिसांच्या पथकाने आरोपी मुलानी याला जमावाच्या ताब्यातून सोडवले. या घटनेनंतर शेलपिंपळगाव येथे तणावपूर्ण शांतता आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र गौर, पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी शेलपिंपळगाव येथे भेट दिली. शेलपिंपळगाव येथे चाकण पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

Breaking News: Called to a hotel and sexual abused

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here