Home अहिल्यानगर अहिल्यानगर: व्यवासायिकेने नदीत उडी घेऊन संपविले जीवन

अहिल्यानगर: व्यवासायिकेने नदीत उडी घेऊन संपविले जीवन

Breaking News | Ahilyanagar Suicide: सलून व्यावसायिकाने नेवासा रस्त्यावरील जोहरापूर येथील ढोरा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

businessman ended his life by jumping into the river

शेवगाव : अतिक्रमण हटविल्याने अडचणीत आलेल्या आणि नैराश्येतून शहरातील सलून व्यावसायिकाने नेवासा रस्त्यावरील जोहरापूर येथील ढोरा नदीत उडी घेऊन जीवन संपविल्याची घटना शेवगाव शहरात समोर आली आहे.  पांडुरंग रामभाऊ शिंदे (वय ५०) असे या सलून व्यवसायिकाचे नाव आहे. बुधवारी (दि.१९) पासून ते बेपत्ता होते. आज शुक्रवारी (दि.२१) दुपारी त्यांचा मृतदेह नदीत आढळून आला. याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

माहिती अशी की, शहरातील विद्यानगर भागामध्ये शिंदे हे कुटुंबासह राहत होते. तर नेवासा रस्त्यावरील बसस्थानकासमोर छोटया टपरीमध्ये त्यांचा सलूनचा व्यवसाय होता. मागील आठवडयामध्ये अतिक्रमणामध्ये त्यांची टपरी काढण्यात आल्याने ते हताश झाले होते. रोजीरोटी हिरावून गेल्याने ते बुधवारपासून घरातून निघून गेले होते. दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह नेवासा रस्त्यावरील जोहरापूर पुलावजवळ ढोरा नदीमध्ये आढळून आला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह नदीतून बाहेर काढला. या घटनेनंतर व्यावसायिकांनी प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला आहे. अतिक्रमणामुळे व्यवसाय जमीनदोस्त केल्याने उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: businessman ended his life by jumping into the river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here