Home जळगाव बस थेट नदीपात्रात कोसळली, आमदार संतापले, अधिकाऱ्यांना दिला दम

बस थेट नदीपात्रात कोसळली, आमदार संतापले, अधिकाऱ्यांना दिला दम

Breaking News | Bus Accident: बस थेट पुलाखालून नदी पात्रात कोसळली. एक महिला प्रवासी ठार झाली.

Bus fell directly into the riverbed, MLA was angry

जळगाव : बस थेट पुलाखालून नदी पात्रात कोसळली. या भयानक अपघातानंतर अपघातस्थळाची पाहणी करण्यासाठी आमदार अमोल जावळे गेले होते. यावेळी त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरुन अधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला. आज सकाळीच भुसावळ रस्त्यावरील आमोदा गावाजवळ इंदोरवरून जळगावकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली श्री गणेश लक्झरी खासगी बस पुलाखाली कोसळून भीषण अपघात झाला. अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

इंदूरवरून जळगावला जाणारी एका खाजगी बस आज सकाळी आमोदयाच्या मोर नदी पात्रात पलटी झाली. यामध्ये जवळपास 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एक महिला प्रवासी ठार झाली आहे. अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र याच रस्त्यावरती गेल्या महिन्यात 25 अपघातांची घटना घडली आहे. याबाबत रावेर विधानसभेचे आमदार अमोल जावळे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अपघातग्रस्त बसची पाहणी केली आणि प्रवाशांची विचारपूस केली. गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याने त्यांनी हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेतला.

आमदार अमोल जावळे यांनी सावदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता विश्वानंद तायडे यांना घटनास्थळी बोलावून, या ठिकाणी वारंवार अपघात का होत आहेत? याची सविस्तर माहिती घेतली. रस्त्याच्या रचनेतील तांत्रिक त्रुटी, चुकीचे वळण, साईन बोर्ड आणि रिफ्लेक्टरची कमतरता, तसेच सुरक्षात्मक कठड्यांची आवश्यकता यांचा सर्वांगीण आढावा त्यांनी घेतला.

या पार्श्वभूमीवर आमदार जावळे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. “ज्या तांत्रिक कारणांमुळे हे अपघात घडत आहेत, त्यावर पुढील आठ दिवसांत ठोस उपाययोजना करून सुरक्षेची हमी द्यावी. अन्यथा यानंतर काही घटना घडल्यास माझ्यापेक्षा वाईट कोणी राहणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. तुम्ही काय करतात, काय देता याच्याशी मला घेणेदेणे नाही, असेही त्यांनी सांगितल. या ठिकाणी अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात. त्यामुळे भविष्यातील दुर्घटनांना अटकाव करणे गरजेचे असल्याचे त्यांनी या प्रसंगी नमूद केले.

Breaking News: Bus fell directly into the riverbed, MLA was angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here